पान:अकबर बादशाहा.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ 8 ] तुजवरी प्रभु तेंवि खरा असे भरंवसा, ह्मणुनी नच भीतसें. १२ [ शिखरिणी ]. जरी चातुर्यानें सकल वसुधा पूर्ण दिसते, जरी या ईशाची कृति उघड दृष्टीस पडते, जरी अस्तित्वाचीं बहुत परिमाणें असति तीं, तरी होई देवा ! मन कधि कधीं नास्तिक किती? १३. [ शार्दूलविक्रीडित]. जें जें इंद्रिय दधलें विषय तो तो भिन्न त्याणें कळे, कर्णाला ध्वनिमात्र हो श्रुत सदा, त्याला रुची नाकळे, नेत्रांनी विविधाकृती सुभगशा सद्वस्तु त्या दीसती, नासालाहि सुगंध वस्तु मिळती तेणें सुखें लाभती. १४ या पंचेंद्रियगणाहुनि दुजें जें श्रेष्ठ ऐसें असे, त्याला सर्व पराक्रमी प्रभु असा ब्रह्मांडभांडी दिसे; अंधाला न पदार्थ सुंदर मुळीं देखावया शक्ति ती, तैसे अज्ञ "जगांत ईश्वर नसे" ऐसें मुखें बोलती. १५ [ शालिनी ]. प्राणाचा जो प्राण तूं देवराया ! 'आत्म्यामध्ये प्रेरणा' दे वरा यो. त्वत्तेजाचें ज्ञान होतांच मातें, सौख्य पात्रे जीव हा, लोकमाते ! १६ १ कानाला. २ हा वर दे, 3 ईश्वराचें विशेषण,