पान:अकबर बादशाहा.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५] [ हरिणी ]. त्रिभुवनं सदा पाहीं जें जें विचार निमन मी, " सकळहि तुझें आहे” ऐसें ह्मणोनि तुला नमीं. मनुज वदतो " हें माझें हें तुझें " जरि सर्वदा जगत मिळतें अंतीं सारें पुनश्च तुझ्या पदा. १७ [ आर्या ]. "दुष्टांनी गांजावे सुष्ट सदा " लोकिं हें असें गमतें, परिमुष्ट सज्जनांच्या राहति निःसंशयेंच सुभग मतें. १८ तत्त्व असें जाणोनी कविता करण्यास मी करीं यत्न, शोधांतीं वेत्यांतें एक तरी सांपडेल जयि रत्न. १९ [ उपजाति ]. गुणीजनाचा गुण घेति सुज्ञ, जाणे तया केंवि यथार्थ अज्ञ ? रत्न मिळाली जरि पारख्यास, तेव्हांच हो मोल तदीय खास. २० कथानकारंभ. [ भुजंगप्रयात ]. मला शारदे ! सांग तो कोण होता मुसलमान राजा जना सौख्यदाता ? जयाची असे कीर्ति या देशि फार, जया मान देती तसा लोक थोर ? २१