पान:अकबर बादशाहा.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६ ] मनीं त्वेष त्याच्या, तरी शांति होती, असे स्वस्थता तेंवि राज्यांत गे ती; लढायास जैसा सदा शूर वीर प्रजेच्या. तसा रक्षणीं दक्ष फार. २२ कुठें पूर्वजांचें तयाच्या रहाणें ? कुठे गादि ती ? यावनाचें घराणें ? कुठे दिल्लि आहे ? कुठे काय आहे ? मला सांग तूं शारदे ! मेरुनी हें. २३ [ द्रुतविलंबित ]. यवन ते करिती जुलुमा किती ! नच जुमानिति ! शस्त्रहि दाविती ! जबरदस्ति करोनिच आपुला यवनधर्म पहा जनि लाविला ! २४ [ भुजंगप्रयात ]. हणाया निघाले मुसलमान दुष्ट, अहा ! जीव ते घेउनी होति तुष्ट; कसे दांडगे हाति तर्वार घेती कुराणा न जो वाचि त्या मारिताती. २५ अशी फार गर्दी कराया तयार कडाका किती मांडती देशि थोर, दिसे जेथतेथें मुसलमानि बाणा, सदा गर्जना "कांनी टाक ! हाणा ! " २६