पान:अकबर बादशाहा.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[<] कोणाचीही होइना छाति जाया युद्धामध्ये यावनांशी झुंजाया. ३१ [ भुजंगप्रयात ]. रणीं रक्त वाहे. सदा लोट चाले. बडा शूर तेव्हां स्वधामांत डोले. परी शस्त्र जागींच राहे पडोनी, जणों स्थान सोडी न भीती धरोनी. ३२ स्त्रियांच्या वरी जोर चाले बहूत, दया येइना, चोरुनी त्यांस नेत मदोन्मत्त ते दुष्ट झाले बलिष्ट, अती गांजले सर्व देशांत सुष्ट. ३३ " अहा ! काळ खायास ये काय ?" वाटे, जना दुःख होई. तसा देश बाटे. अशा वेळि येई दया श्रीहरीला, धनी चांगला सत्वरें पाठवीला. ३४ मायून गादीवरी जो बसे, तों स्वराज्यांत दंगा महाथोर होतो. जुमानी न कोणी; न ऐके नृपाला; असा काळ तेव्हां झपाटा निघाला. ३५ [ शालिनी ]. बंडे मोठी होउनी जागजागीं वीर्यश्रीची मूर्ति राहे जागी-