पान:अकबर बादशाहा.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ९ ] या राजाला राज्य तें आटपेना, तेणें चिन्हें होति उद्भूत नाना. ३६ [ द्रुतविलंबित ]. शिरशहा वळकाउनि गादितें, जनमुखास्तव योजित युक्तितें; बहुत यत्न करी सुधरावया, सकळ राज्यहि आपण घ्यावया. ३७ [ शालिनी ]. स्थानीं स्थानीं योग्य कार्मे करोनी, मोठे मोठे बंगले बांधवोनी, लोकांमाजी गाजवी कीर्ति फार, होई तेणें हर्ष चित्तांत गार. ३८ रस्ते मोठे तेंवि बांधोनि कोठे, पाण्याचेही योग्य केलेत सांठे, कोठें जंगी पूल नाल्यांस केले, तैसे कोठें खोदवी थोर नाले. ३९ [ भुजंगप्रयात ]. करी बंद साया लुटारूपणाला, जयांचा असे त्रास मोठा जनाला अशा युक्तिनीं तुष्ट होती समस्त, तयाला दुवा निस ते लोक देत. ४०