पान:अकबर बादशाहा.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्माविषय होई [ १६ ] वाद कराया तयार जो पहिला, तो परदेशाचाही राजा संभाषणेच्छु हो झाला. ६९ [ साक्या ] काळ असा मग कांहीं गेला बहुत सुखें दोघांचा, घुमायून तों करी विनंती घेण्या निरोप साचा. ७० देइ फारशी राजा साला सेना शत्रु वधाया; सर्व सिद्धता करुनि निघाले खपुरीं तेव्हां जाया. ७१ ज्या बंधूंनीं द्वेषे त्याशीं केलें वंड अघोर, पराभूत ते करुनी दोघे मेळविला अधिकार- ७२ बरी स्वस्थता देशी राहे; राज्य सुखानें चाले; विघ्नें तेव्हां जाति पळोनी, शत्रु सर्वही गेले. ७३ परी नृपाचा शेवट आला जण तया भेटाया, सवें घेउनी यम मृत्यूला कीं सत्वर ये न्याया. ७४ अकस्मात एक्या दिवशीं तो आला मौज कराया, किल्ल्यावरती उभा राहुनी शोभा पाहत राया; ७५ समीप होतें मंत्रीमंडळ, तसा प्रधानहि होता, वारा सुटला वराच तेणें खालि न येइ पहातां ७६ गडी माणसें अनेक आपुल्या स्थानीं स्थानिं वसोनी गोष्टी करिती आनंदानें, सुखानुभव घेवोनी ७७