पान:अकबर बादशाहा.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१७] सुगंध शीतळ पदार्थ सेविति उणें न भासे कांहीं जागा मोठी होति मनोहर, मूल्य तिचेंही नाहीं. ७८ रस्त्यामाजी इतक्यामध्ये झाली गडबड मोठी, ती जाणाया इच्छा होई राजाला बहु खोटी ७९ धांवत गेला हाणुनि सत्वरें खिडकीपाशीं राय, त्या वेगानें भान न राहुनि अवघा खाली जाय. ८० भयाभीत सगळे मग झाले, ओरड होई भारी, rat कोणी प्रार्थनि देवा, "संकट तूंच निवारीं." ८१ न्युमायून बेशुद्ध होउनी, पडला त्या मैदानीं; जमती सारे सभोंवार ते सेवकजन अभिमानी. ८२ उपाय करिती अनेक ऐसे, विपुल शिंपिती नीर, वारा घाली कोणी अनुचर, निश्चळ कोणी वीर. ८३ घालुनि पालखिमधीं तयाला घरीं आणिला जेव्हां, गेली घटिका एक पूर्ण जों ये आरामच तेव्हां. ८४ मार्ग दिसे स्वर्गाचा त्यातें या वेळेपासोनी, विरागता येई चित्त बहु विषय सर्व जावोनी. ८५ एक मनीं परि आशा होती कीं पुत्रा पाहीन, प्रेमें उपदेशांकुश धरुनी मन त्याचें वळवीन. ८६ [ द्रुतविलंबित ]. " जवळ ये मनमोहन बाळका ! "अकबरा ! मजला अति भीशि कां ?