पान:अकबर बादशाहा.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१] " तुजशिवाय सख्या मम जीव हा "तळमळे तरि येथ जरा रहा. ८७ "जरि तुझी जननी परिवर्तली, "तरि असे तुजला मम सांवली; "परि इथोनि पुढे परिरक्षिता "प्रभुविणें दुसरा न असे. सुता ! ८८ "अजुनि मूल तुला ह्मणती जन "तरि असे बहु खोल तुझें मन " तुज पित्यासम मानिति लोक ते "ह्मणुनि पात्र विशाळ सुकीर्तितें. ८९ [शार्दूलविक्रीडित]. " द्रव्यासाठि करूं नको जुलुम तूं, कोणास गांजूंं नको, "राहूदे मनि शांतता, न कधिही इच्छीं दुजी वायको, "जो कोणी तुजला विचार अथवा सल्ला तशी देइल, "त्याचा पूर्वि विवेक फार करितां ये सिद्धिचें तें वळ [ भुजंगप्रयात ]. " करीं प्रार्थना नित्य तूं स्वप्रभूची, "असे सर्व कृत्यांवरी दृष्टि ज्याची, "कुराणांत तूं ठेव भक्ती तुझीरे "तरी मेळवीलें तुवां येथ सारें. ९१ "असे धर्म हा तेथुनी सर्व एक, "जरी मानिती भिन्न ते मूढ लोक;