पान:अकबर बादशाहा.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २. [ शिखरिणी ]. स्वदेशी जे राजे झटुनि जनकल्याण करिती, तयांच्या नांवाचा गजर जागं होई बहुरिती, तयांचीं सत्कृत्यें श्रवण करुनी लोक वदती 66 अहा रे ! तूं राया ! खचित असशी धन्य नृपती ! १ [ पृथ्वी ]. अलौकिक असें अह्मां सुचिर सौख्य ज्याने दिलें, असे यवन जातिचा, सुगुण मोहुनी राहिले, पुरा विदित बालकांप्रतिहि आपुल्या देशं या, स्वयें जनक नांव दे अकवर प्रभूला तया. २ [द्रुतविलंबित ]. यवन तो परि हिंदुच वाटला, प्रभु न, माय जनाप्रति भासला, सकळ पूर्वज दुष्ट जयाप्रती, तुळस कीं उगवे जणुं भांगि ती. ३ [ वसंततिलका ]. मारी स्वशत्रु अवघे, मग तत्त्रियांचा तो केशभार हरि, वीर रणांत साचा, सातें अकबर ह्मणोनि यथार्थ नाम लोकीं मिळे, वदति ज्यामति सौख्यधाम. ४