पान:अकबर बादशाहा.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२२] [ शिखरिणी ]. नवा राजा होई लवकर पदारूढ णुनी, जिथें तेथें मोठी रुचिर विलसे कांति भवनों; शशी अस्ता जातां, उदित रवि होता, सुभगशी पुरांमध्ये शोभा विविध चमके फारच तशी. ५ [ शार्दूलविक्रीडित] ]. खेळे खेळ अनेक पूर्ण धरुनी ईर्ष्या मनीं तो युवा, फेंकी राय वसोनि वाजिवरती चेंडू पहा आडवा, किंवा घेउनि कौतुकें निजकरीं भाला झुगारी बळें, तेणें त्रामुनि कोपयुक्त मग तो हत्ती भयानें पळे. ६. [ रथोद्धता ]. योग्य पाहून गडी तयासवें, युद्ध रोज करण्या शिके नवें; होइ तो चतुर फार यामधीं, नाद यास दुसरा न हो कधीं ७ वय तेरावे लागे [ आर्या ]. राज्यावर तो वसे पहा नृपती, बाळक परि शोभे बहु, दुसरे भूपति तयापुढे लपती. ८ आनंदित प्रजांचीं दिसती वदने तयीं पुरामाजी,