पान:अकबर बादशाहा.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२३] राज्यश्री ती शोभे साला, जैशी नरास रामा जी. ९ झाली सर्व तयारी करिती अभिषेक त्या अकबरास, जो ईशाच्या कृतिनें सौंदर्याचीच भासला रास. १० वाजति अनेक वायें शहरोशहरीं तमाम सारीं तीं, इंद्राच्या अभिषेक वाजविती सुर जसे तयें रीती. ११ किंवा पर्जन्याचें.. येणें सुचवोनि मेघनादानें, सुंदर वस्त्राच्छादित वीज चकाके नभीं स्वरूपाने. १२ किंवा वसंतसमयीं वनशोभा विलसते जशी फार, विहगगणाच्या योगें सुचवी आनंद आपुला थोर. १३ तैशी राज्यश्री ती वाद्यध्वनिने समस्त पौरांस लावी हर्ष कराया, आशिर्वचनें तशींहि यायास. १४