पान:अकबर बादशाहा.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२५] रिघाव न मिळे जिथे नृप बसे स्वराज्यासनीं, अगण्यसुखपूर्ण तो दिवस भासला या जनीं . १९ [मंदाक्रांता]. कोठें कोठें निजभवनिं हो लाविती लोक झेंडे, कोठें नानाविधहि दिसलीं रम्य सौंदर्यतुंडें, रस्ते तैसे विमळ करुनी गंधनीरादिकांनी, पौर प्रेमें श्रवण करिती गायनातें खकणीं. २० [ शिखरिणी ]. स्त्रिया शृंगारांनी सजति किति हर्षे, मग तयीं दिसे सोन्याचीही विविध रचना या सुसमयीं, करीं वाळे तेव्हां धरुनि पथि जाती सुवदना, पुन्हां येती मार्गे बघुनि निजमार्गात रमणा. २१ [ साक्या ]. नाच तमाशे जेथें तेथें होती मार्गी तेव्हां, मोरें जैशीं हर्पे नाचति जलद गर्जतो जेव्हां . २२ स्वाऱ्या निघती मार्गी मार्गी दाटी भारी होई, अश्वावरती वसोनि कोणी नवल पहाया जाई. २३ हस्ती पृष्टी घालुनि कनकालंकृत अंबारी ती, बसती मध्ये घेउनि हर्षे पुष्पगुच्छ ते हातीं. २४ मधुरगायनामृत कर्णानीं पान करिति कोणी ते, सुखर वायें करीं घेउनी वाजविती तालांते. २५ पोषाखाच्या नादामाजी डुलती कोणी जेव्हां, भान न राहे मदांध सारे जन होती हो तेव्हा. २६ 3