पान:अकबर बादशाहा.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२६] ऐशापरि बहु गडबड चाले पुरमार्गांतुनि लोकीं, तेणें भासे सुखमय अवघें, देवपुरी नेणों कीं. २७ [ इंद्रवज्ञा ]. hor जनांनी अभिषेक त्याला. सर्वत्र मोठा मग हर्प झाला. राजे परी अन्य न होति तुष्ट, तेव्हांच शत्रू उठले सुपुष्ट. २८ तो चालवी अम्मल अन्यधामीं, घे आपणालाच समस्त भूमी, कोणा न थोडाहि जुमानि, तेणें युद्धप्रसंगास पडेच जाणें २९ [ पृथ्वी ]. पठाण रजपूत तो सकळ सैन्य घेवोनियां, लढाउ जन अन्यही मिळति संगरीं यावया, मनांत जळती, परी बहुत भीति ये तन्मनी, तथापि समरांगणी त्वरित पातले त्या दिनीं. ३० [ मालिनी ]. अकबर निजसेना घेउनी ये जयाला, तिळ न हृदयं खंती वाटली हो जयाला, फिरवुन मग शस्त्रा बोलला आपणांतें, 66 'लवकर करितों मीं शत्रुच्या कंदनाते." ३१