पान:अकबर बादशाहा.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२७] [ आर्या ]. झाले दोनहि तट ते करण्या युद्धप्रसंग या समयीं, राहत उभे जाया भूमिवरी सुप्रफुल्लदर्भमयीं. ३२ [ इंद्रवज्जा ]. नाना तऱ्हेचे दिसतात लोक, शोभे तयांचाहि विचित्र झोंक, कोणी शिपाई कपड्यांत दंग, खड्गाकडे पाहत कोणि गुंग. ३३. अश्वांस नानाविध भूषवीती, त्यांतें पहा झालर शोभवी ती, मानेवरी केश वळोनि गेले, वेणी पहातांच तुरंग डोले. ३४ घेवोनि हातांत महान भाले: कोठें लढाऊ जनसंघ चाले, पायांत तो पायजमा चढोनी गेला, असे चालति वीर रानीं. ३५ शानीत नाचे बहु शिंगवाला, फुंकोनि शिंगास तयार झाला, अंगीं चढे त्वेष तया अपार, वैसा असे देहिं बहुत जोर. ३६