पान:अकबर बादशाहा.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २८ ] [ शिखरिणी ]. निशाणें सूर्याच्या प्रखर किरणांनी चमकती, भरानें वायूच्या "फडफड " असा शब्द करिती, जरीचे त्यामध्यें असति पटके सोज्वळ किती, अनेक रंगांनी अतिशय मनोहारि दिसती. ३७ [ मालिनी ]. करि हि सकळ तेव्हां शोभती भूषणांनी, महविति जायें सांतें फार रंगादिकांनी, विविध रुचिर चित्रे काढिलीं सोंड तेणें, समरिं गणपतीचें होइ साक्षांत येणें. ३८ [ शालिनी ]. तंबू मोठे ठोकले जागजागीं, होट्याही थाटल्या थोर मार्गी, डेरे देई यापरी सर्व सेना, कोणाच्याही चित्ति शांती वसेना: ३९ ठायीं ठायीं वाजते दुंदुभी ती, जी ऐकोनी मानसीं येड़ भीती, ढोलाचा तो शब्द गंभीर थोर, वोले, " येथें युद्ध होणार घोर ! ४० [ भुजंगप्रयात ]. "हणाहो ! हणा !" शब्द ऐसा निघाला, सुरू होइ तो शत्रुचा दुष्ट घाला,