पान:अकबर बादशाहा.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२९] किती मर्दुनी टाकिती वीर पायीं, मरोनी किती शूर जाती अपायीं. ४१ रणीं धैर्य सोडी कितीकांस तेव्हा, कडाका उठे मारण्याचाच जेव्हां, किती भीतिनें जाति कोठें पळोनी, feat आडमार्गी महादाट रानीं. ४२ असे वीर सैन्यांत तो एक मोठा स्वभावें ह्युमायूनचा पुत्र, ताठा ! तुरंगावरी वैसुनी धांव घेई, समस्तापुढे झुंज घेण्यास जाई. ४३ नदीचा जसा वेग होवोनी मोठा, जमे एकजागीं जळाचा सुसाटा, कड्याच्या वरोनी उडी घाड घे कीं, तसा हा लढाया निघे वीर बांका. ४४ [ शिखरिणी ]. पठाणांच्या पैकीं कवणहि धजेनाच सहसा पुढे याच्या येण्या, वळकटी अहो ! तो नृप असा, झुगारावा चेंडू गरगर हवेमार्जिं, मग तो फिरे जैसा, तैसा अकबर रणीं फार घुमतो. ४५ तदा तद्वीरश्री त्वरित अवधे जिंकुनि अरी जयस्तंभा स्थापी, जय मिळवुनी या अवसरों,