पान:अकबर बादशाहा.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३०] मतापाचा डंका मिरवित निघाली खनगरीं, जणों आनंदानें अकवर पती घेउनि करीं. ४६ [ साक्या ]. इकडे त्याचे शत्रू लाजुनि निजगृहिं निघोनि गेले, वाइट वाटे त्यांच्या मनि की यश भूपतिनें नेलें . ४७ शस्त्रे हातीं घेउनि निंदिति तुच्छ मानुनी सांतें, गोड न लागे कांहीं जेव्हां स्मरती पराजयातें. ४८ परस्परांला दोष लाविती, निंदिति परस्परांला, "मुसलमान हा मत्त होउनी वुडविल या राज्याला. ४९ " कसे तुझी सगळे भेकड हो! शूर एकहि न आहे." ऐसें बोलुनि संघ रिपूचा स्थानीं स्वस्थचि राहे. ५० हेतु मनांतिल पूर्ण न होतां स्थिति जनिं व्हावी जैशी, होई तेव्हां पठाण रजपुत यांचीही हो तैशी. ५१ धैर्य न उरलें वर करण्याला मान पुन्हा लज्जेनें, " काय करावें! काय न किंवा "न सुचे मुळींहि तेणें. ५२ [ भुजंगप्रयात ]. स्थिती होत ऐशी निघाले घराला, तयीं घालिती रानि ते घोर घाला, निराशेमुळे भीति पोटीं उरेना, तसें त्यांस तें चित्तही सांवरेना. ५३' उडोनि त्वरें अश्व ते धांवतात, नसे शद्ध कांहीं तयांला वनांत,