पान:अकबर बादशाहा.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३५] "हीचे हे ग्रह सर्व फार असती युक्त प्रभो ! सौख्यद, "जीच्यापासुनि मानवर्धन तुझें, संतानशांतिप्रद. " [ भुजंगप्रयात ]. जरी वाटलें दुःख थोडें नृपाला, तरी ऐकुनी शब्द हे हर्प झाला. समाधान जो मानसी नित्य ठेवी, तया श्रीहरी सर्वदा सौख्य दावी- ७६ [ वसंततिलका ]. झाली प्रसूत मग ती रमणी तयाची, कन्या जिला प्रथम होइ सुरूप साची, देखावया वरित ये नरपाल राणी. जोशीहि सर्व वदती, "खरि होय वाणी !”७७ दुसरा भाग समाप्त.