पान:अकबर बादशाहा.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३८ ] सांप्रतची बहुधा जी, त्यांमधं राजे कधीं न ते चुकती. १० पण रत्नें सांपडती, सर्व ठिकाणी असें जगीं नाहीं; मग नीतीचे राजे, प्रेक्षक जन सर्वदा कसे पाही? ११ संस्कृत भाषा ज्याच्या, दरवारी विलसली, असा नृपती यवनांमध्यें अकबर ; विद्या जेथें प्रभाव दाखविती. १२ [ स्रग्धरा ]. पाहोनी हिंदुशास्त्रें नवल बहु तथा जाहलें हो ह्मणोनी बोलावी पंडितांतें चतुर निजसभेमाजि वित्तादिकांनी; सत्कारोनी तयांतें श्रवणकरि सदा वाद अन्योन्य त्यांचा धर्मज्ञानार्थ यत्नें सतत करितसे स्नेह विद्वज्जनांचा. १३ [ भुजंगप्रयात ]. जगन्नाथराया ह्मणोनी सभंत, असे एक विद्वान् दुजा पंडितांत, जयाला असे चार शास्त्रीं गती हो, जया सारिखा अन्य वेत्ता न तो हो. १४