पान:अकबर बादशाहा.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४२ ] तयास नृप देउनी विपुल वित्त संतोषवी, प्रसन्न मन आपलें मग तयावरी दाखवी. ३० पंडित [ शुद्धकामदा ] वाद होइ तो, ऐकुनी समाधान पावतो, भूप त्या सभेमाज जाउनी, सादरें बसे तुष्ट होउनी ३१ [ भुजंगप्रयात ]. जगन्नाथरायास हो गर्व मोठा, " असें थोर मी, " हा असे फार ताठा, न विद्वज्जनीं वांकवी मान राय, अशी आढ्यता मानसीं ज्यासि होय. ३२ [ शिखरिणी ]. . तयाची विद्वत्ता प्रबळ बहु होती खरि जरी, तिच्या गर्वे त्याचें बहुत न पडे तेजच तरी, जणों या डागानें गुण सकळ वाटे अवगुण, स्वभावें विद्या ती परि जानें करी खप्रसरण. ३३ [ भुजंगप्रयात ]. सदा तुच्छ मानी दुजां पंडितांतें, न इच्छी मुळीं मान देण्यास त्यांतें, सदा स्पर्धिती एकमेकांस फार खले यापरी होई वादास द्वार. ३३