पान:अकबर बादशाहा.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४६ ] बादशहानें स्वागत, केले त्यांचे सहर्ष तें साचें. ४९ फत्तेपुरास होती राजाची वसति सा सुसमयास, तेथे मोठ्या थादें स्वारांनी आणिलें तदा त्यांस. ५० त्या ख्रिस्ती लोकांनी दिधले सन्मानपूर्व नजराणे, स्वीकारी नृप त्यांतें, मानुनि आभार फार हर्षानं. ५१ देती स्वधर्म पुस्तक बैबल नामक तयास वाचाया, यवनी भाषेमध्ये भाषांतर करविलें असे द्याया. ५२ या चिन्हांनी जाणिति, "की स्वीकारील धर्म हा आपुला." आशा उद्भवली बहु, अंग तिचा तत्क्षणीं परी झाला. ५३ बोलावी वरचेवर दरवारी पादण्यांस तो राय, तेही सोत्सुक येती, परि त्यांचा यत्न फुकट हो जाय. ५४