पान:अकबर बादशाहा.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४. [मंदाक्रांता]. प्रातःकाळी उपवनिं दिसे रम्य शोभा तरूंची, चारी तेव्हां उमलुनि दिशा कांति भासे रवीची, पानें सारी चमकति किती रात्रिच्या या देवानें, मोत्यें नेणों पसरुनि दिलीं सृष्टिच्या नायकानें ! १ [ शिखरिणी ]. जलाच्या विंदूंची रचिलि जणुं माला वहुमुदें, 'जगाच्या कर्त्याची कृति अखिल जीवांस सुख दे ! चिदानंदाच्या त्या वघुनि हिरवे पादप कृपे, जणों आनंदानें धरणिवर ते गाळिति टिपें ! २ सकाळी कारंजी उडत असतां शीतळ हवा ! तशी पुष्पें होती विकसित, सुगंधें डुलति वा, तयांची ज्या काळी विलसति पहा हास्यवदने, जनाच्या चित्ताला रमविति अनेकाख्य सुमनें. ३ फुलें वेचायाला जमति मिळुनी कांहिं अवला, तयांचीं वारा तो उडवि लुगडीं दाउनि कला, जणों झोंवे अंगा तरि हि न निवारी जन तथा, झटे कीं देखाया अवयवच ते ! सोडुनि भया.