पान:अकबर बादशाहा.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५० ] [ इंद्रवजा ]. माळी सुमाला करण्यास वेंची, पुष्पें भुईच्या वरलींच साचीं, किंवा करानें फलगुच्छ तोडी, ज्याची दुजा वस्तुस ये न तोडी. ५ " [प्रहर्षिणी ]. 'झाडांनीं मधुरफळें बळें धरावीं, भारानें नमुनि उपासना करावी, " ऐसे ते विहग तदा तरूवरोनी, गुंजातें करिति सकाळ कीं स्मरोनी ६ आंब्याचे तरुण फुल फार झाले, मोहोरा रसमय पाहि, पक्षि डोले; त्यांमध्यें स्वर मग गोड कोकिळांचा, होई तो श्रवण करोनि हर्ष साचा. ७ [ वसंततिलका ]. एके दिनीं उपवनीं रमणीयकाळी, तो राय पंडित निघे कुतुकें सकाळीं, तेथे समोर सहसा मग पाहि कन्या, जी रूपमूर्ति विधिनें घडलीच धन्या. ८ [ द्रुतविलंबित ]. मन तदीय हरोनि कुमारि ती, सुतनु मोहित त्यास करी किती !