पान:अकबर बादशाहा.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५२ ] [ पृथ्वी ]. " असेल वनदेवता उपवनास राखावया ! 'कदाचित सुरांगना भुवन येइ देखावया ! " 46 " उगीच अथवा मला मनिच भास हा होतसे ! 66 न कांहि अनुमान तें समयि या मला हो तसें १४ 'दिसे वयहि कोंवळें अजुनि लग्न झालें नसे, ' हिच्या सहज नेसणावरुनि वाटतें हें असें, " " असंशय हिला करी मदनवाण फार व्यथा, 'मनोहर तरी कसें वदन खिन्न जें सर्वथा १५ [ आर्या ]. " यवनाची कन्या ही, " वस्त्रांवरुनी दिसेच निश्चय हा, " विनय हिच्या तनुला तरि, शोभा देई किती विचित्र अहा !” १६ [ भुजंगप्रयात ]. असे आपणाशीं वदे, जाय तों ती, नसे चैन तेव्हां गमे फार खंती, कुठे चित्त साचें रमेना मुळींही, परी कामवाणांस दुःखार्त्त साही. १७ "" [ आर्या ]. ' कोण असे ही !" ह्मणुनी, पुसतां ते लोक उत्तरा देती,