पान:अकबर बादशाहा.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५७ ] [ मालिनी ] ases नगरीं ती ऐकुनी विप्रजाती, वरि यवनकुमारी सोडुनी ब्रह्मजाती; ग्रहण करित भार्या तो जगन्नाथ आहे, नवल बहुत त्यांना वाटले पाहतां हैं. ३८ ह्मणति "बुडविलें हो पंडितानें स्वधर्मा, "हर! हर ! परलोकीं भोगिशी तूं स्वकर्मा, "असुलभ जननीच्या घेउनी जन्म पोटी, "कशितरि ! अविचारें गोष्ट ही केलि खोटी. "३९ [ आर्या ]. राजाच्या गृहिं येउन ब्राह्मण निंदिति अशापरी त्यास, होई अशी अवस्था, लोकविरुद्धममादकर्त्यास. ४० गांजिति लोक तयाला, दूषण देवोनि कष्टवती ते, तैसे बहुविध छळिती, जीनें वरिलें द्विजास त्या सतितें. ४१ नाहीं निश्चय ढळला, परि त्या सत्यानुरक्तरायाचा, सोशी तो छळ अवघा, दृढ होता नेम यापरी ज्याचा. ४२