पान:अकबर बादशाहा.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५८ ] " स्तुति निंदा मानिति सम "धीर सदां न्याय्य मार्ग सोडिति न, " भर्तृहरीचें वागे, मनिं त्याच्या सज्जनांस है वचन. ४३ [ वसंततिलका ]. " हा भ्रष्ट! हा अधम ! पाप ! तसा विनष्ट, "स्पष्टार्थ हा बहुत होतिल यास कष्ट, "होवोनि पुष्ट वनला अतिमत्त खष्ट, " सोशील हाल नरकीं करि काळ पिष्ट. ४४ "याला गती परजगीं न मिळेल सत्य "लोळेल दुःखनिकरीं विविधा अगस, "हें घोर कर्म अति निंद्यच आचरीलें, “शिक्षा यमावरिं घडेल, न कांहिं चाले. ४५ [ भुजंगप्रयात ]. पुन्हा कावळ्यासारिखे लोक जेव्हां, दयाहीन ते गांजिती त्यास, तेव्हां करी राय गंगानदीप्रार्थनेला, जिच्यामाजि उद्धारहेतूच ठेला. ४६ [ इंद्रवज्जा ]. गंगातिरी जाउनि वैसला तो, पत्नी सवें घेउनि राय जातो, घटावरी जी रमणीय भासे, शोभा, तयें हो मन दंग खासें. ४७