पान:अकबर बादशाहा.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५९ ] [ पृथ्वी ]. सहास्य मग आळवी धरुनि भक्तिला मानसें, विनम्र अति होउनी करयुगास जोडीतसे, अगाध महिमा तिचा हृदयिं आणुनी सादरें, करी विविध वर्णन, मवल पाप तेणें सरे. ४८ [ इंद्रवज्रा ]. भार्या तयाचीहि करांस जोडी, प्रेमाश्रु नेत्रांतुनि फार सोडी, पतिव्रतेचा सतत स्वधर्म, जेणें प्रियाच्या अनुसार कर्म: ४९ [ आर्या ]. पतिला अपुल्यासाठी होती इतुके महान कष्ट, असें पाहुनि दुःख तिलाही होइल अनिवार या क्षणीं न कसें? ५० भर्त्याच्या सन्निध ती, बैसुनि झाली कृतार्थ सुभग सती, जें घडणार तयाची, वाट पहाया करी तयार मती. ५१ गंगाप्रार्थना. [शिखरिणी ]. "तुझी लीला गाती जन सकळ माते! सतत है, "मनुष्यांचीं पापें अखिल जळतीं तत्सुनिवहें,