पान:अकबर बादशाहा.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६० ] " पहा ! ज्या ज्या वृक्षा जननि ! तव तीराश्रय मिळे, " तयाला तूं देशी जल पुरवुनी पुष्प सुफलें. ५२ [ पृथ्वी ]. " रवी किरण पाडुनि तुजमधीं जणूं नाचतो, " दिनान्त घडतां शशी उगवुनी तुला वंदितो, "प्रवाह तव वाहतो सुभग शांत गंभीरसा, " मनास बहु देइ तो विमल हर्ष माते! कसा ! ५३ [ हरिणी ]. " रमणिय अहा! जन्तू अम्बे! तुझ्या उदरीं किती, "सुखमय सदा यांच्या क्रीडा मनोहर भासती, " मकर वसती नीरामध्यें भयंकर फारसे, " तरिहि सुभगे ! शोभे मूर्त्ति त्वदीय कृपारसें- ५४ [ मालिनी ]. "जननि! तुजविणें या पामरा अन्य कोण ? " ग्रहण करिल सांगें देउनी वारिपान, "करिशि अवन सांचें थोर पापी असे जे, "तरि वद! मग ओझें घेशि तूं कां न माझें ? ५५ [मंदाक्रांता]. "उद्धारीं गे खरित मजला होउनी आई आतां, " जावो माझी सकळ मनिची वत्कृपेनें अहंता, "पापें सारी दहन करुनी मुक्त मातें करावें, "या दीनातें सदय जननी! खोदरीं त्वां धरावें. ५६