या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. मेहेरबान दक्षिणा मैझ कमिटीनें आठ नऊ वर्षांमागें अ- कबर बादशाहावर काव्य लिहिणारास वक्षीस देण्याचें जाहीर केल्यावरून मी हें काव्य रचिलें. त्यावेळीं माझें वयही थोडे असून शाळेत विद्यार्थी होतों. इतिहासाचें ज्ञानही तादृश नव्हतें झणण्यास हरकत नाही; तथापी त्या वेळी अकवराविषयीं जी थोडी माहिती होती व कित्येक आ- ख्यायिका ऐकिवात होत्या त्या एकत्र करून प्रस्तुत का- व्य मी रचिलें. या कारणानें त्यांत अकवराविषयीं ऐति- हासिक माहिती फार थोडी आणि आहे ती सुद्धा फारशी विश्वसनीय नाहीं असें आढळेल. तथापि 'इतिहासाचा उत्तमपणा त्यांतील मजकुराच्या खरेपणावर जितका अ- सतो तितका काव्याचा असत नाहीं. व कवित्वाची पारख वरील कारागिरीवरूनच मुख्यतः करावयाची असून मूळ द्रव्याची मातबरी रसज्ञ तादृश धरीत नसतात. ' या काव्याचे भाग पांच; त्यांचा भागशः सारांश:- [१] शीरशाहानें हांकून लाविल्यावर घुमायून इराणच्या दरवारी पळून जातो. या प्रवासामध्यें त्यास अकबर हा पुत्र होतो; पुढे इराणच्या शहाच्या मदतीने तो आपली गादी मिळवितो व थोडे दिवस राज्योपभोग घेऊन, अकबर लहान असेपर्यंत, बहिराम नावाच्या प्र- धानाच्या स्वाधीन राज्य कारभार करून तो मरण पावतो [२] १३ वर्षे झाल्यावर अकबरास राज्याभिषेक होतो; त्याच्यावर शत्रूंनी पाठविलेल्या सैन्याचा तो पराभव करितो; पुढे त्याचे मोठ्या थाटानें लग्न होते; नंतर त्याची स्त्री गरोदर राहते व मास पुरे झाल्यावर कन्या प्रसवते ( जिचें पुढें जगन्नाथराय पंडिताशीं लम झाले आहे. ) [3] यांत ज-