पान:अकबर बादशाहा.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६८ ] येती चदुनी सत्वर अकबर सेनेवरी पहा वेगें, तेणें या पक्षांतिल लोकांला परत जावया लागे. १५ राजाच्या सरदारां- पैकीं कांहीं तयार युद्धाला होते, परि कांहींचा धीर मुळीं जावया न हो झाला. १६ [ इंद्रवजा ]. " आले पहा चालुनि हे बळानें, " आतां पळावें बहुधा लरेनें, ' राहे न कांहीं दुसरा उपाय, चालून गेल्यास घडे अपाय." १७ बोलावया यापरि लागले ते, कोणासही भान न फार होतें; मागे फिराया झटती भयानें, राजास हो संभ्रम प्राप्त यानें. १८ [ शालिनी ]. सल्ला नाहीं वाटली योग्य त्याला, वेगें चाले जावया धीर झाला, शुरखानें पाय मार्गे हटेना, जिंकायाची कामना ती सरेना. १९