पान:अकबर बादशाहा.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७१ ] तो नगरांतिल लोक प्रभुला भेटावयास येतात. २९ देश सुधारायास्तव यत्न करी थोर थोर तो चतुर, जें जें हित लोकांना घडवी तें द्रव्य खर्चुनी प्रचुर ३० [ इंद्रवज्जा ]. बागा मळे यांस सहाय्य देई, उत्पन्न तेणें मग थोर होई, 'सारा जमीनीवरचा उणा वे, उत्कर्ष देशामधं होइ वेगें. ३१ लोकांवरी जो कर फार होता, झाला तयां जो वहु त्रासदाता, तो काढुनी तोषवितो जनांस, त्यांच्या तदा वाढवितो सुखास. ३२ मार्गी लुटारू पथिकांस फार तेव्हां वळें नाडिति, दुःख थोर, राया तयांते धरवोनि आणी, ते शासना भोगिति चोर कोणी. ३ - ऐशी व्यवस्था करुनी मजेतें देई सुसौख्य, न गणी श्रमातें,