या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[<]

गन्नाथराय पंडितावद्दल हकीमत आहे. अकबराला दुसरे धर्म समजून घेण्याची उत्सुकता व ख्रिस्ती धर्मोपदेशकांचें नैराश्य यांचे कथन आहे. [४] उपवनामध्यें वादशाहाचे मुलीची व जगन्नाथरायाची दृष्टादृष्ट होते व दोघांच्याही मनांत एकमेकांविषयीं मीति उद्भवते. ही सर्व गोष्ट पंडित हा युक्तीनें बादशाहास कळवितो व शाहाजादी आपणास बायको करावी म्हणून त्याची प्रार्थना करितो; हा नाद जाण्यासाठी मु- सलमान होशील तर मुलगी देतों म्हणून बादशाहा त्यास सांगतो जगन्नाधराय ह्या गोष्टीस कबूल होऊन आपला इष्ट हेतु सिद्धीस नेतो. यावनी बायको केल्यानें ब्राम्हण लोक त्याचा छळ करतात; म्हणून तो गंगेची स्तुति करतो; प्रत्येक श्लोकासरशी भागीरथी एकेक पायरी चढून ज्याठिकाणी जगन्नाथराय स्त्रीसहवर्तमान बसला होता तेथे येऊन त्या दोघास घेऊन मागें परतते. [५] अकबराच्या अमलाविरुद्ध गुजराथे- मध्ये वगैरे जी बंडे झाली त्याचा त्याने कसा मोड केला या हकीगतीनें - पांचव्या भागास आरंभ होतो. नंतर लोकांच्या कल्याणाकरितां व सुखा- करितां त्याणें जीं अनेक कृत्ये केली त्यांचे वर्णन आहे आणि ज्या अ- कवरी मोहोरांविषयीं सर्वत्र प्रसिद्धि आहे त्या प्रचारांत कशा आल्या हे सांगून पांचव्या भागाचा व सर्व काव्याचा शेवट केला आहे. या काव्यामध्ये बरेच दोष राहिले मलाच वाटतें व ते सुधरतांही आले असावे असें माझें असते. परंतु द० कृति कशी होती हैं प्र. कमिटीस पसंत पडलेली माझी लोकांस समजावे यासाठी जसेच्या तसेंच, हस्व दीर्घाचे अल्प स्वल्प दोष शुद्ध करून, छापविलें आहे. गुणदोष विवेचकांस या काव्याची परीक्षा करितानां तें केव्हां लिहिलें होतें हैं लक्षांत बाळगण्याविषयीं विनंती आहे. गो. वा. कानिटकर.