पान:अकबर बादशाहा.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७४ ] शिष्ये त्याचे पाहती मौज निस, अन्याला हैं ठाउ नाहिं कृत्य- ४३ राजा भक्तिप्रेम तो फार दावी, तत्रापी ही गोष्ट त्याला न ठावी. वैरागी तो सुज्ञ होता ह्मणून, सांगेना त्या जादूची कांहिं खूण. ४४ [ इंद्रवज्जा ]. ऐशापरी काळ बहूत गेला, नाहींच वृत्तांत कळून आला, एके दिनीं त्याप्रति भेट द्याया ये भूपती सेवक घेउनीया. ४५ [ शिखरिणी ]. ह्मणे राया तेव्हां "गुरुजि! मज सांगोनि किमया " करावी ही माझ्यावर उपकृती सुज्ञ सदया ! 66 66 'जरी आहे चेला बहुत दिन मी दीन तुमचा तरी व्हावा कांहो मजवरि न तो लोभ गुरुचा ४६ [ पृथ्वी ]. कृपाकरुनि सांइजी ! विदित गूढ हैं आगळे कराल तरि तूमचें मन खुषी असें तें कळे. अनुग्रह गुरू जरी करि न, शिष्य कैसा तरे ? 'ह्मणोनि किमया मला समजतां व्यथा संहरे. ४७ १. दूर होईल.