पान:अकबर बादशाहा.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७८ ] [ इंद्रवजा ]. तें स्थान शिष्या मग त्यास सांगे, ज्याला धनाचा बहु लोभ लागे, वस्त्रे तया सर्वहि देउनीयां एके दिनीं ये नृप त्याच ठायां. ६२ तों औषधे घेउनि कांहि त्यांचा आहे गुरू तो वनवीत सांचा, त्या स्थानिं जावोनिच वादशाहा पाहोनि वोले, " गवसे, अहा ! हा ! ६३ [ आर्या ]. घेउनि त्या शिष्याचीं वस्त्रे चेला खतांच तो बनला, गुरुजी थोडा होता अंध ह्मणोनी तया नसे दिसला. ६४ [ शिखरिणी ]. गुरूला वाटे कीं जवळ मम शिष्या वसतसे, नृपाला तो सांगे ह्मणुनि, " मिळवीं औषध असें," तयाच्या आज्ञेला अनुसरुन तें राय करितो, महा चातुर्यानें सकल मग भट्टी समजतो. ६५ [ इंद्रवन्ना ]. सर्वौषधी ठाऊक होति त्याला तैशी क्रिया पाहुनि हर्ष झाला, १. मूस.