या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकबर बादशहा यावर काव्य. -180-8084- भाग १. मंगलाचरण. [ शिखरिणी ]. जयाच्या सत्तेनें त्रिभुवन सदा चालत असे, जगीं ज्याची कृत्ये दिसति, अति चातुर्यहि तसें, धनी जो सर्वांचा, सदयत्दृदयें पालन करी, अशा देवा ! यावी मदत कविला या अवसरी. १ [मंदाक्रांता]. रानोरानी फिरफिरुनियां धुंडिलें सर्व कांहीं, तो विश्वात्मा परि गवसला, सत्य हो सत्य, नाहीं ! जें जें नेत्रीं सहज पडतें त्या ठिकाणीं वसे तो ऐसें वाटे, पण न मनुजा कां प्रभू दृश्य होतो ! २ [ शिखरिणी ]. से सर्व स्थानीं, तरि न जड वस्तूच बनला; जडाचें घे रूप प्रभु, तरि तया अंत भिडेला; अगा विश्वेशा हे ! क्षणभरिच माझ्या मनि दिसें ! यी पापाचें या दहन सगळं होइ न कसें । ३ १ परमेश्वर सान्त (नश्वर ) असें होतें.