या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अकबर.

२५

 सिद्धराम - माझी सर्वप्रकारें सहायता करण्याविषयीं आपण तयार आहांत हा आपला मजवर मोठाच अनुग्रह आहे. ज्याच्याविषयीं मी आपले देशीं असतां अनेक गोष्टी ऐकिल्या आहेत तो बादशहा सलामत व त्याचा राजकीय दरबार केव्हां पाहीन असे मला झालें आहे.
 सल्हाण --- निःसंदेह. परंतु, सांगतों या गोष्टीकडे अवश्य ध्यान दे. तेथें गेल्यावर बादशहाकडून अगर द्रबारीलोकांकडून कोणत्याही दुर्लभ गोष्टीची आशा करूं नकोस. प्रथमतः कोणत्याही मोठ्या गोष्टीची आशा न धरणें हेंच तुला जास्त श्रेयस्कर होईल.
 सिद्धरामानें साश्चर्य होऊन विचारिलें, ' काहो ! जशी बादशहा सलामत यांची कीर्ति मी आजपर्यंत ऐकत आलों त्याप्रमाणें वस्तुतः ते नाहींत काय ? माझे परमपूज्य वडील आणि माननीय गुरुजी हे तर त्यांची प्रशंसा करून ह्मणतात कीं, तो अत्यंत बुद्धिमान् आणि सुयोग्य सम्राट् आहे, ही गोष्ट यथार्थ नाहीं काय ? "
 सल्हाणानें उत्तर दिलें, ' माझें असें ह्मणणें नाहीं. माझ्या म्हणण्याचें तात्पर्य इतकेंच कीं, मोठ्या लोकांतही दोष म्हणून असताच आणि प्रायः ते दुसऱ्या लोकांना घातक होतात कोणी ऐकत नाहीं असें  " ज्यावेळी एखादा पुरुष त्यानें पुन्हां चहूंकडे पाहून व जाणून हळू स्वरानें बोलण्यास आरंभ केला. अकबराप्रमाणें केवळ आपली, बुद्धिमत्ता आणि बाहुबल यांचे जोरावर ऐश्वर्य प्राप्त करून घेतो, त्यावेळीं त्याची तृष्णा कधीहि शांत होत नसून ती उत्तरोत्तर वाढतच जात असतं. ज्या बादशहानें इतके देश आणि इतके लोक यांना आपले स्वाधीन करून घेतलें आहे;त्याला तुझी आणि तुमची मातृभूमी पूर्णपणे स्वतंत्र राहिलेली कधींही सहन व्हाव- याची नाहीं आणि तुला ठाऊक असेलच, (यद्यपि ही गोष्ट गुप्त आहे ) कीं, ज्याप्रमाणें पूर्वी नंदिगुप्त आणि त्यांचा भाऊ यांमध्ये वितुष्ट आलें होतें, त्याप्रमाणेंच आपलें प्रस्तुतचे काश्मीराधिपति आणि त्यांचे दोघे पुत्र यांमध्यें प्रायः अनेकवेळा वितुष्ट पडलेलें आहे,
 सिद्धराम — नाहीं, मला हा वृत्तांत विदित नव्हता, ही गोष्ट मी प्रथ- मतः आपल्याच सुखानें ऐकत आहे. सल्हाण - असो. वेळ आली ह्मणजे तूं या गोष्टीची चांगली विचारपुस