पान:अक्षर गौरव - शतकोत्तर हीरक महोत्सव स्मरणिका.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातादा आमच्या सोमवारातल्या घरी आण्णांच्या सेवेसाठी बोर्डिंगमधली मुलं असत. मला पाटील हा त्या पैकी एक अवलिया होता. त्याला बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचायचा नाद होता. तो नाद त्यानं मलाही लावला. आण्णाचं आम्ही काय वाचतो, काय करतो, आम्ही काय खातो. आमचे मित्र कोण कोण आहेत याकडं बारकाईनं लक्ष असायचं. असच एक दिवस मी रहस्यकथा वाचताना आण्णांना सापडलो. त्यांनी विचारलं, 'काय वाचतो रे !' 'पुस्तक.' ‘आण बघू.' मी त्यांच्याकडं पुस्तक दिल. तसं त्यांनी चाळलं आणि सुनावलं. 'या पुढं रहस्यकथा वाचायच्या नाहित. ' 'बरं !' मी घाबरुन म्हणालो. पुन्हा रहस्यकथा वाचताना पुन्हा मी आण्णांना सापडलो. तसं आण्णा संतापून मला म्हणाले. 'तुला एकदा सांगितलेलं कळत नाही---- ? आण ते पुस्तक. ' मी ते पुस्तक आण्णांच्या हातात दिलं. तसं आण्णानी ते संतापून फाडून टाकलं.' पण रहस्यकथा वाचणं ही एक नशा असते. चार आठ दिवस गेल्यावर मी आण्णा गावाला कधी जातात हे पाहू लागलो. आण्णा नेहमीच फिरतीवर असायचे. मग आण्णांच्या अनुपस्थितीत माझं रहस्यकथा वाचन जिवंत राहू लागलं. पण एक दिवस नशिब बिघडलं. फिरतीवर जाणार म्हणून गेलेले आण्णा न जाता घरी परतले आणि मी सापडलो. तसं संतापानं थरथरत आण्णा ओरडले. 'तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही ?" आण्णा संतापानं कापत होते आणि मी भीतीनं कापत होतो. पण आत हुकमाचा एक्का माझ्या हातात होता. मी सगळा धीर एकवटून म्हणालो. 'आण्णा यात गैर काय आहे ?" 'मला उलट विचारतोस...?" 'आण्णा यशवंतराव चव्हाणं सुध्दा रहस्यकथा वाचतात. 'कुणा गाढवानं सांगितलं?" 'गाढवानं नाही वर्तमानपत्रांनी सांगितलय. ' गोरख 'आण बघू.' मग मी रद्दीतून तो सकाळ हुडकून आणला आणि तो आण्णांच्या स्वाधीन केला. त्यात यशवंतरावांनी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा राजकारणाचा ताण त्यांच्यावर पडे तेव्हा तेव्हा तो तो कमी करण्यासाठी ते बाबूराव अर्नाळकर वाचत. आण्णा गप्प झाले. पण त्यानंतरही मी रहस्यकथा वाचताना आण्णाना अनेकदा सापडलो पण आण्णा कधीच काही बोलले नाहीत. बाबूराव अर्नाळकरांच्या सर्वच्या सर्व एक हजार रहस्यकथा मी वाचल्या आहेत. अर्नाळकरांच्या सुबोध, आणि निर्मळ शैलीचा प्रभाव माझ्या लिखाणाच्या शैलीवर पडला आहे असं म्हटलं तरी चालेल. पुढं आण्णांनी मला चरित्रं वाचायला सांगितली. ते मला आवडलं आणि आवडतंही. अगदी आजही ग्रंथालयात गेल्यावर कुणाचंही चरित्र काउंटरवर दिसलं तरी त्यावर मी झडप मारतो. या चरित्र वाचताना मी काही फक्त थोरा मोठ्यांचीच चरित्र वाचतो. खरं सांगायचं तर तीच मला जास्त भावून जातात. त्यांची दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या आर्थिक परिस्थित्या, त्यांना तोंड द्यावी लागलेली संकटं बघून त्यांच्यापेक्षा आपलं नक्कीचं बरं आहे ही भावना सुखावून जाते. माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकात अरुण साधूंचं मुंबई दिनांक आणि कर्नल मनोहर माळगावकरांचं वादळवाटा ही दुसऱ्या बाजीरावावर आणि नानासाहेब पेशव्यांच्या जीवनावरचं पुस्तक मला प्रचंड आवडली. मुंबई दिनांक हे त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरच ओघवत पुस्तक आहे. हे पुस्तक मी घरी आणल्यावर वडिलांनी ते सहज चाळलं. त्यांना ते आवडलं. त्यांनी ते रात्री दहाला वाचायला घेतले आणि पहाटे पाचला पूर्ण केल्यावरच ते झोपले. सिंहासन नावाचा मराठी चित्रपट मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यावर बेतला आहे. पुपुल जयकराचं इंदिरा गांधीच्यावरचं राखून राखून लिहिलेल पुस्तक आवडलं. पण त्यापेक्षा ब्रिटीश पत्रकार कॅथेरिन फ्रँकचं खुल्लम खुल्ला लिहिलेलं पुस्तकजाम आवडलं. तिचं मेहता प्रकाशननं मराठीत अनुवाद केलेलं पुस्तक एकदम झकास आहे. सुधीर फडक्याचं अर्धच लिहिलेलं चरित्र आवडलं त्यांच्या चिरंजिवानी श्रीधर फडक्यानी ते पूर्ण करावं अस आवर्जून वाटत. तसच महाराणी गायत्री देवीच 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' हेही एक झकास पुस्तक आहे. महाराणी विजयाराजे शिंदेंच अपुर चरित्रही झकास. तसच रागिणी पुंडलिक, पाध्ये यांची पुस्तकही चांगली आहेत. जयश्री गडकर, लिला चिटणीस, भालजी पेंढारकर, शांताराम, विजय आनंद, दादा कोंडके, संगीतकार राम कदम, ना. घ. देशपांडे यांची चरित्रही चांगली