या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Կ8 जाऊन मानसिक श्रम करण्याची रीति प्रचारांत दिसत आहे ती आरोग्यशास्त्रदृष्टया फारच अपायकारक आहे. प्राचीन काळची शिक्षणपद्धति म्हणजे सकाळीं अनशेपोटीं व सायंकाळीं अन्न जिरल्यावर विद्यार्थीगण अभ्यास करीत असे. त्यामुळे त्यांची शक्ति, आकार, बुद्धि वगैरे वर्णनीय होतीं. परंतु अलीकडे तें सर्वच बदलल्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या पचनेंद्रियांवर दाब बसत जाऊन तीं नबळीं होत जातात. त्यामुळे हल्लींची पिढी अशक्त होत होत निस्तेज व शुष्क काष्ट्राप्रमाणें जेवणानंतर कोणत्याही कामास लागणें झाल्यास निदान दोन तास तरी मध्यें वेळ गेला पाहिजे. कारण जेवणाला आरंभ केल्यापासून पचनेंद्रियांच्या उद्योगाला सुरवात होते. रसग्रंथींकडे अधिक रक्त येऊं लागतें व त्यामुळे त्यांपासून पाचकरस भसाभस निघू लागून अन्नाचें पचन होऊँ लागतें. एकंदरीत, पचनक्रिया चालली असतां रसग्रंथींना पाचकरस तयार करण्यास रक्त पाहिजे असतें, आणि अशा वेळीं आपण जर जेऊन लगेच धांवपळ करीत एखाद्या शारीरिक किंवा मानसिक श्रमाच्या कामास लागलों तर रक्तानें कोटें बरें जावें ? ज्याप्रमाणें घरांतील गडचाला एकाच वेळीं इकडून तिकडून दोघांतिघांनीं हाक मारून काम सांगावें म्हणजे त्याची जशी तारांबळ उडून जाऊन कोणतेंच काम त्याच्याकडून नीटपणें पार पडत नाहीं, त्याचप्रमाणें किंबहुना जास्त तारांबळ वर सांगितलेल्या रक्ताची होत असते. ज्याप्रमाणें व्यवहारांत पैशाशिवाय कांहीं चालत नाही, त्याचप्रमाणें शरीरांतील कोणतीही क्रिया रक्ताशिवाय चालत नाहीं. म्हणून जेवणाची वेळ कामावर जाण्यापूर्वी अन्न होतें व बांधून ठेवलेल्या कुत्र्याच्या आमाशयांतील पचनक्रिया पूर्ण होऊन आमाशय रिकामा झालेला होता. यावरून जेवणानंतर धांवपळ करणें किती घातक आहे. याचा वाचकांनींच विचार करावा.