पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशाच आठ ते दहा श्रेणी असत. याला ‘व्यवस्थापनाची उभी पध्दत’ (व्हर्टिकल मॅनेजमेंट) म्हणत.
 सध्याच्या स्पर्धेच्या युगात ही रचना महागडी ठरू लागली आहे .कारण यात व्यवस्थापकांची संख्या नको इतकी जास्त होतेशिवाय वरचे काही स्तर सोडले तर मधल्या व खालच्या स्तरातील व्यवस्थापकांना वरिष्ठांकडे ‘रिपोर्ट' करणं याखेरीज काही अर्थपूर्ण कामही नसत. त्यामुळे आता व्यवस्थापकांची संख्या कमी करण्याकडे व असलेल्या व्यवस्थापकांवर जास्त जबाबदारी टाकून ती पार पाडण्यासाठी अधिकारही अधिक देण्याकडे उद्योगांचा कल आहे. परिणामी देशातील सुप्रसिध्द व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून अव्वल गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व्यवस्थापकांनाही अवेळी ‘निवृत्त' व्हावं लागत आहे. या पध्दतीने अनेक समस्यांना जन्म दिला आहे.
जीवनशैलीवर परिणाम:
 स्वेच्छानिवृत्ती होताना एकटाकी मोठी रक्कम हातात पडणे हा फायदा असला तरी सध्या व्याजाचे दर इतके कमी आहेत की, त्यातून पगाराची भरपाई होत नाही. साहजिकच उत्पन्नाचा अन्य काही मार्ग नसेल तर पूर्वीपेक्षा स्वस्त जीवनशैली आचरणात आणावी लागते. या परिस्थितीबरोबर जुळवून घेणं मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण जातंं.काम गेल्यामळे आलेल्या निराशेचाही विपरीत परिणाम होतो. समाजातील आपलाी पत घसरल्याची जाणीव होते.विशेषत: पूर्वी उच्चपदस्थ असणाच्यांच्या बाबतीत ही जाणीव अधिकच बोचरी असते.
कौटुंबिक संबंधांवर परिणाम:
 घरातील कर्त्या पुरुषाला किवा स्त्रीला काम नसेल तर अनेक कौटुंबिक समस्याा निर्माण होतात. दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असणारा मनष्य काम संपवून घरात आला की कुटुंबीयांशी शक्यतो संघर्ष न करता प्रेमाने वागण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कारण घरच्याशी त्याचा संपर्क फार कमी वेळ असतो. मात्र, तो अधिक काळ घरात राहू लागला तर छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद निर्माण होतात. त्याचे पर्यवसान कौटुंबिक कलहात होतंं. अशा ‘सक्षम बेकारां ची संख्या वाढल्याने एकंदर समाजाचे नितीधैर्य खचतं.‘त्या आतासारखा उच्चशिक्षित माणूसही बेकार झाला, मग आपले काय होणार' या विचाराने माणसं हादरून जातात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त भयानक वाटू लागते.
समस्येवरील उपाय:

सबका मुदावा कर डाला अपना ही मुदावा कर ना सक
सबके गिरबी सी डाले अपनाही गिरेबाँ भूल गये’
स्वेच्छा निवृत्ती: घर घर की कहाती/११०