पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 (मी सर्वांच्या अडचणी दूर केल्या पण स्वतःची अडचण सोडवू शकलो नाही. सर्वासाठी कपडे शिवले,पण स्वतःलाच विसरलो.) असं एका कवीने म्हटलं आहे. आपण नोकरीत असताना असंच कुटुंबातील वागत असतो. सदस्य, मित्रपरिवार, सगैसोयरे यांची काळजी वाहताना स्वत:च्या भवितव्याचा विचार करण्यासाठी वेळ असत नाही. वेळ असला तरी विचार स्वार्थीपणाचं वाटतं.
 व्यवस्थापन गुरु पीटर ड्रकर यांनी म्हटले आहे की, काही दशकांपूर्वी माणूस ३०-३५वर्षे सेवा बजावल्यावर निवृत्तीनंतरच्या जीवना बाबत विचार करत असे.२१व्या शतकात इतका कालावधी सेवा बजावण्याची संधी मोजक्या भाग्यवंतांनाच मिळेल.मुळ कर्मचाच्याला एक करिअर सुरू असतानाच पर्यायी करिअरसाठी तयारी सुरू करावी लागते. याकरिता त्याला आपल्या इतर क्षमतांचा विकास करण्यासाठी स्वत:ला काही वेळ देणे आवश्यक आहे. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारावी लागण्याची शक्यता असणाच्यांनी ड्रकरच्या या उपदेशावर गंभीरपणे विचार व कृती केली पाहिजे.
तात्पर्य :

 ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्थम् त्यजती पंडिताः’ असं एक संस्कृत वचन आहे.याचा अर्थ असा की, वेळेवर अर्धा भाग सोडून दिला तर उरलेला अर्धा भाग तरी वाचू शकतो.नाही तर सर्वच नाश पावते. उद्योगधंद्यांची आजची परिस्थिती पाहता मनुष्यबळाची घट अपरिहार्य आहे. तसं न केल्यास उद्योग क्षेत्राचाच पाडाव होण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांनी याची जाणीव प्रारंभापासून ठेवून योग्य उपाययोजनेचं ‘पॅराशूट' जवळ बाळगल्यास सोयीचे होईल.

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची/१११