पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंवा सरकारांना हे साध्य करता आलं आहे.
 प्रशासकीय कामकाज उत्तम चालावं, याकरिता नोकरशाहीला प्रशासकीय व्यवस्थापनाच प्रशिक्षण देणंं आवश्यक असतंं. एका बाजूला सत्ताधीश तर दुसच्या बाजूला जनता, या दोघांच्याही अपेक्षा पूर्ण करण्याची तारेवरची कसरत या व्यवस्थापकांना करावी लागते.साहजिकच, त्यांना प्रशिक्षणही तशाच पध्दतीचं द्यावं लागतं. तर ते देताना कोणत्या अडचणी येतात का याचा विचार या लेखात केला आहे.
 नोकरशहांची निवड करणंं आणि त्यांना ‘तयार' करणंं, यासाठी जगभर अनेक पध्दतींचा अवलंब केला गेला आहे. त्यापैकी दोन काळाच्या कसोटीवर टिकून राहिल्या आहेत. एक,तुर्की पध्दत तर दुसरी चिनी पध्दत.
तुर्की पध्दत:
 दुसऱ्या सहस्रकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये ही पध्दत अस्तित्वात आली. त्यावेळी युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात सतत लढाया होत असत. त्यामध्ये सुरुवातीला तुर्कस्थानच्या ओटोमन मुस्लिम सुलतानांची सरशी झाली. या साम्राज्याचा विस्तार जसजसा वाढत गेला, तशी त्याचा कारभार पाहण्यासाठी विश्वासू नोकरशाहीची गरज भासू लागली. असे प्रशासकीय नोकर मिळविण्यासाठी तुर्की सुलतानांनी अजब शक्कल लढविली.
 जिंकलेल्या भागातील खिश्चन तरुणांना पकडांयचं,त्यांचं धर्मांंतर करायचंं आणि प्रशासकीय कामांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर कामं सोपवायची अशी ती पध्दत होती. अशा नोकरांना 'गुलाम'म्हणून ओळखले जाई.विशिष्ट कामात सुलतानाचंसमाधान होईल, इतकं प्रावीण्य दाखविल्याशिवाय गुलामाला ते काम मिळत नसे.सुलतान त्यांची सर्व काळजी घेई, पण त्यांना विवाह करणंं किंवा अधिकृतरीत्या मुलांना जन्म देेण यावर बंदी घालण्यात आली होती. गुलामाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीची मालकी सुलतानाकडं जाई.
 यामुळंं ओटोमन सुलतानांचा दुहेरी फ़ायदा झाला. त्यांना निष्ठावान नोकर मिळले. तसंच राजघराण्यात जन्म झाला आहे,या एकाच गुणवत्तेवर प्रशासनात घुसू पाहणाऱ्या अकार्यक्षम व्यक्तींना मज्जाव करणंंही शक्य झालं.या पध्दतीतील धर्मांंतराचा भाग वगळता सध्याही खासगी व सरकारी क्षेत्रांमध्ये प्रशासकांची निवड व प्रशिक्षण याच पध्दतीनंं केलं जातं.
चिनी पध्दत:

 स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून नोकरशहांची निवड करण्याची पध्दत चिनी सम्राटांनी केली.प्राथमिक परीक्षा विविध प्रांतांच्या राजधान्यांमध्ये तर अंतिम परीक्षा

अद्भूत दुनिया व्यवस्थापनाची/१७३