पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

संकल्पनांना सुरुंग लावला.
 इतिहासकाळी अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान होती. संपत्ती म्हणजे जमीन आणि सोनं अशी संकल्पना होती. या दोघांनाही मर्यादा असल्याने बळाचा वापर करून दुसऱ्याला लूटल्याशिवाय श्रीमंत होता येत नसे. मात्र औद्योगिक अर्थव्यवस्थेत इतरांना गरीब न बनविताही श्रीमंत बनता येतंं हे औद्योगिक क्रांतीनं सिध्द केलं.
 त्याचप्रमाणे श्रीमंत व्यक्तीमुुळे समाजही श्रीमंत बनतो, हे औद्योगिक क्रांतीने दाखवून दिलं. औद्योगिक जगात श्रीमंत बनण्यासाठी समाजाचं शोषण करण्याची आवयकता नाही. तर पैशाच्या मोबदल्यात समाजाची दर्जेदार वस्तू आणि सेवांची आवश्यकता भागवून समाजाचा फायदा करून देता येतो. म्हणजेच हि 'विन टू विन' परिस्थिती असते. हे औद्योगिक अर्थव्यवस्थेतच शक्य असतं.
 कोणत्याही उद्योगाचंं सर्वात प्रमुख ध्येय फायदा कमावणं हेच असतं. मात्र संपत्तीच्या या उत्पादनात सहा वाटेकरी असतात.
 १. गुंतवणूकदार
 २. ग्राहक
 ३. कर्मचारी
 ४. पुरवठादार
 ५. सरकार
 ६. समाज
 उद्योगाच्या व्यवस्थापनाला या सहा वाटेकऱ्यांंबरोबर सामंजस्याचे संबंध ठेवावे लागतात. या संबंधालाच ‘उद्योगाची आचारसंहिता' किंवा 'बिझनेस एथिक्स' म्हणतात. या आचारसंहितेमुळंं हे संबंध समतोल, न्यायोचित व परस्परपूरक असे राहतात.
 एथिक्स हा शब्द ग्रीक एथिकॉस या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ ‘वागण्याची पद्धती' किंवा परंपरा असा आहे. प्रत्येक वेळी या पद्धतीचे तार्किक कारण सांगता येईल असं नाही. उदाहरणार्थ, आपण देवळात जाता, तेव्हा पादत्राणं काढून ठेवावी लागतात. चर्चमध्ये जाता, तेव्हा डोक्यावरची हॅट उतरवावी लागते. हे केलं नाही तर काय होईल हा प्रश्न गैरलागू आहे. ज्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणचा मर्यादाभंग होऊ नये म्हणून हे सर्व करावे लागते.

 आचारसंहितेचंं स्वरूपही 'मुल्यां'प्रमाणं प्राथमिकतेवर ठरते. उद्योगक्षेत्रात परंपरेनुसार गुंतवणूकदार ही पहिली प्राथमिकता असते. संस्थेच्या फायद्यातील त्याचा वाटा सर्वप्रथम द्यावा लागतो. मात्र जसजशी संस्था ‘व्यावसायिक’ बनत जाते, तसा या स्थितीत बदल होतो. हा बदल घडवून आणणारे घटक असे.

व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये /२४५