पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यापैकी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने काही खरेखुरे आवश्यक प्रकल्पही रखडलं गेले आहेत. सांप्रत काळातील व्यवस्थापनाला उद्योगांचं स्वरूप व नीतिमूल्यं ठरविताना या घटकाचा विचार करणंही आवश्यक बनलं आहे.
 खडकाळ मार्ग असला तरी पाणी जसं त्यातून वाट काढतं, तसं वरील सर्व परिवर्तनातून नव्या व्यवस्थापनाला आपला मार्ग शोधला पाहिजे. बदल होणं हा न बदलणारा निर्णय आहे. पण त्यांच्याबरोबर स्वतःला जुळवून घेणं आणि आपलं इप्सित साध्य करणं यात व्यवस्थापकाचं कौशल्य आहे.
 १५०० वर्षांपूर्वी चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशियसने म्हटलं होतं, ‘जगात बरोबर किंवा चूक म्हणजे नेमकं काय हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, कोणतीही टोकाची भूमिका नेहमीच चुकीची असते. समतोल राखणं नेहमीच बरोबर ठरतंं.'

 उद्योगांची नीतिमूल्ये व आचारसंहिता ठरविताना हे तत्व आचारणात आलं पाहिजे.तर उद्योगांची गुणवत्ता सुधारेल. नव्या काळाची आव्हानं यशस्वीपणे स्वीकारण्यास ते सक्षम ठरतील.

नीतिमूल्ये आणि आचारसंहिता /२४९