पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पदांवर स्वतःच्या समाजातील किंवा नात्यातील व्यक्ती नेमल्या जात असत. त्या व्यक्तीही मालकाशी व व्यवसायाशी प्रामाणिक राहत. मात्र, आता हा विश्वास आणि स्वामीनिष्ठा कमी झाली आहे.आयकर, अबकारी कर चुकविण्याच्या आरोपाखाली खटले सुरू असलेले कित्येक उद्योगपती नातेवाईक किंवा आपल्या समाजाच्याच माणसांनी आपल्याला यात अडकवले म्हणून तक्रार करताना दिसतात.म्हणजेच एका बाजूला उद्योगाच्या बदलत्या स्वरूपाचे आव्हान तर दुसर्या बाजूला स्वतःच्याच माणसांकडून धोका होण्याची शक्यता अशा कात्रीत कुटुंब नियंत्रित उद्योग सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य काळजी करण्यासारखे आहे.

 कुटुंब नियंत्रित उद्योगांच्या चालकांनी सरंजामी वृत्ती सोडणे हा या समस्येवरील उपाय आहे.उद्योग माझ्यासाठी नसून मी उद्योगासाठी आहे, याची जाणीव ठेवल्यास हा गुंता काही प्रमाणात सुटू शकतो. व्यवस्थापकीय व इतर उच्च पदांसाठी अधिकाऱ्यांची निवड करताना गुणवत्ता हा एकमेव निकष लावण्याची सवयही त्यांनी लावून घेतली पाहिजे. मी म्हणेन ती पूर्वदिशा असा दुराग्रह न धरता नवे विचार, नव्या संकल्पना समजून घेणे, आपल्या अनिर्बध अधिकाराचं विकेंद्रीकरण करणे, अहंगंड टाळून तज्ज्ञ व अनुभवी जाणकारांचा सल्ला घेणे, त्यांचा योग्य तो मान राखणं (मग त्या 'आपल्यापैकी' नसल्या तरी) इत्यादी हे समस्यांमधून बाहेर पडू शकतील.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२५२