पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

युग ‘एकलव्याचं'

शाळेत शिकत असताना आम्हाला संस्कृत विषय होता. त्याचा पहिलाच तास घेण्यासाठी आमचे शिक्षक वर्गात आले आणि म्हणाले, 'मुलांनो, आपण भाग्यवान आहात.’आम्ही अचानक भाग्यवान कसे झालो याचे आश्चर्य वाटले. ‘का’ म्हणून विचारता, ते म्हणाले, ‘आपण कोणता विषय शिकणार आहोत, माहीत आहे का?’ ‘संस्कृत', आम्ही उत्तरलो.

 'संस्कृत काय आहे, हे आपल्याला माहीत आहे का?’ त्यांनी विचारलं. 'हो, ती एक भाषा आहे, आमच्यापैकी बहुतेकांनी उत्तर दिलं. मात्र, काही म्हणाले, 'तो भरपूर गुण मिळवून देणारा विषय आहे.’ (आमच्या वेळी गणित, विज्ञान व संस्कृत हे तीन स्कोअरिंग विषय असत.)
 'दोन्ही उत्तरं चुकीची आहेत. संस्कृत ही केवळ भाषा किंवा गुण मिळवून देणारा विषय नव्हे. आपल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचं ज्ञानभांडार खोलणारी ती चावी आहे. एकदा ती तुमच्या हाती लागली की, सारं धन तुमचंंच समजा.' शिक्षकांनी सांगितलं. वर्गात आम्ही चाळीस विद्यार्थी होतो. शिक्षकांचं म्हणणं प्रत्येकाला पटलं नाही. केवळ १० -१२ विद्यार्थ्यांनीच त्यावर विश्वास ठेवला.
 मॅट्रिकनंतर पुढच्या शैक्षणिक जीवनात संस्कृतशी माझा संबंध आला नाही. केमिकल इंजिनिअॅरिंग किंवा नंतर एमबीए या शिक्षणक्रमात तो विषय नव्हता. तरी आजही मी संस्कृत वाचतो. माझ्या शिक्षकांनी मला केवळ तो विषय शिकवला नाही, तर पहिल्याच तासापासून त्या विषयाबद्दल उत्सुकता आणि आवड निर्माण केली. एकदा एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण केली की, विद्यार्थीं तो स्वतःच्या प्रेरणेने पुढे शिकत राहतो.
 थोडक्यात विद्यार्थ्याचा एकलव्य होतो. महाभारतातील एकलव्यानं गुरू द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकण्याची स्फूर्ती घेतली. नंतर त्यानंं ही विद्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वयंप्रयासाने गुरुवर अवलंबून न राहता साध्य केली.

 असे एकलव्य तयार करणे हीच शिक्षकाची जबाबदारी आहे. केवळ ‘स्पून फीडींग'

युग ‘एकलव्याचं' /२६१