पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/161

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्तेश्वरकृत साजिरी दिसतसे ।। ४०३।। कस्तूरी रेखिली निटिळा । त्यावरी जडित भांगटिळा । मुक्ताहार मिरवे गळां । दिव्याभरणे शोभती ॥ ४ ॥ ऐशी वरी वरी देखतां डोळा । अधोद्वारी सुटली लाळा । तृष्णा सर्पिणी गुह्यबिळा । तोड घाली ल. वलाहे ।। ५ ॥ परि विचारे सारोनि चीर । अंतर न पाहती च पामर । घायमखासम छिद्र । रक्त स्रवे सर्वदा ।। ६ ।। दुर्गंधीचे जन्मस्थान । संयोगाचेनि मिषे जाण । चित्त वित्त आयुष्य हरण । हारोनि सांडी पुरुषाचे ।। ७ ।। ह्मणसी मानविनी कनिष्ठ | आपुलें देहवरिष्ठ । हें बहुतांचें उच्छिष्ट ताट । घोंगायलें विकारी ॥ ८ ॥ खरकटलिया पात्राचे कांठ । चोहाटां चाटिती श्वानांचे थाट | तैसे स्वाँगनेचे वीठ । स्वर्गाजात्याने चंबावे ।। ९ ॥ देवळी मांडिली भेरी। बडवितीया कोण निवारी । तैसी वक्षस्थळाची परी | आवडे तेणे मर्दावे ।। १० ।। की वाकळ पडे वाटेवरी । ते काठीने उचलिजे वाटसरी । तैसी नितंबवस्त्राची परी । उघडित्या नाहीं निषेध ।। ११ ।। बाळसमुदायाचे साळे । दगड कमाविले वाटोळे । ते उचलावे पुरुषे सबळे । तैसे परी कुचयुग्म ।। १२ । उखळ राविले धर्मशाळे । भलती कांडी भलत्या वेळे । तैसें कामालय मोकळे । स्वर्गकामे योजती त्यां ।। १३ ॥ की ग्रामद्वारी मांडिले खोडे । अन्यायी पायी सुदती देवडे । तरी तृप्ति न मानुनी तोड। उघडे असिजे सर्वदा ।।१४।। तैसे बहुती बहुतकाळ | शवशवूनी केळे थळ । तरी भोगित्या पुढे उतावेळ । सन्मुख सदा पसरले ।।१५।। नरक उदर भयानक । भोंवते वडवाग्नीचे मुख । परुषवीर्य सिद्धोदक | नित्य सावता शर्मना ।। १६ ।। भग भडाग्नीच आहे | जानद्वय करपले पाहे । त्या वरी आच्छादिले आहे । रम्या वस्त्रे करोनी ।। १७॥ ऐशी नारी यया नावीं । पुरुष उन्मादलता जाणाची । स्वर्गमोक्षसखाची आडवी । मार्गार्गळा अवघड ।। १८॥ कळे स्त्रीदही नरक पूर्ण | कळे भोगियां भवबंधन । न कळे कां पा तेथींचे मन | जाणा नेणा च लाधलें ॥१९॥ स्त्रीदेह नरकसमद्र । जाणोनि तेथे रमती नर। त नरकरूपी घोर संसार । कैशा परी तरतील ॥ २० ॥ जेथे जन्म तेथे रमती । हे संसारिकांची रीती । विष्टामत्रद्वारी रमती । ते कमीरूप निर्धारे ।। २१ ।। एसे छा छा कराना देखा । निंदितां रंभा चढली तवका । मग करिती झाली काय एका । जन्मजया श्रोते हो ॥ २२ ॥ शुकशब्द उल्का शिवतां श्रोत्री । रंभा पोळली जिव्हारीं । तें शल्य काढावया बाहेरी । फाड करी स्वहृदया ।। २३ ।। दोही करींची दाही नखे । उदरीं रोवनियां निकें । द्विभाग करून म्हणे देखे । निर्मळ की हे कश्मळ ।। २४ ॥ मौक्तिकशुक्तीची पुटे । उकलितां अंतरी चोखटें । कर्पूरकेळीचे गोटे । सारे पदर सोलिल्या ।। २५ ॥ ऐसे जठरींचेनि वोटी । ३६ चीर वस्त्र. ३७ भेरी नगारा. ३८ वाकळ गोधडी.