पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/170

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतमुखरावणवध. (१४९) नावरे निशाचरा । ह्मणे गोत्रबंधु पाचारा । प्रायश्चित मी जाणे ॥ १२ ॥ न करुनीयां प्राणनाशा । विभीषणा लंघवीन दश दिशा। तरी च कुंभकर्णाची स्नुषा । पुत्रवती एकलो ।। १३ ।। ऐसे वदोनीया त्या अवसरा । सवे भरला गगनोदरा । क्षीरसिंधूच्या पैलतीरा । मायापुरा पातला ॥ १४ ॥ तेथे नसती चंद्रसूर्य । निबिड दारूण अंधःकार | माजी असंख्य वृक्ष निशाचर । पर्वतप्राय एक एक ।। १५ ।। येउनी शोणितापुरा । नित्य त्राशिती दिनकरा । तयां सकळां मध्ये धुरा । मुख्य रावण शतमुख ॥ १६ ।। त्याचे वंदुनीयां चरण । पौन्डरीक निघाला शरण । पूर्व वृत्तांत कहनी श्रवण । पुढें विनंती निवेदिली ।। ॥ १७ ।। जे जे राक्षस कुळाधम । रामाग्नि लाउनीयां केलें भस्म । तो मम पूर्वजामाजी अधम । निर्भयपणे नांदत ।। १८ ।। त्यातें करूनी पदच्युत । म्यां ची होणे लंकानाथ ।। हा मज याचकाचा मनोरथ । पूर्ण करीजे दातारा ।। १९ ।। अवश्य ह्मणोनी शतमौळ । सवें घेउनी अपार दळ । गगनपंय उतावेळ । मेघाकृती चालिला ।। २० ।। सर्व उतरून लंकापूर । दोनी वर्षती शस्त्रभार । बिभीषण होउनी घाबरा थोर । झुंजार वोरा पाचारी ।। २१ ।। सज्य करोनी सकळ दळ । युद्ध केले अति तुंबळ । परंतु ते परचक्र दळ | असंभाव्य आगॐ ।। २२ ।। बिभीषण सैन्य भद्रजाती । शत्रुशस्त्रे सिंहाकृती । झगटती प्राणयशोकीर्ति । एक ही तेव्हां न लाहे ।। २३ ।। जाणोनी ते अलोट विन्न । चौघां प्रधानां सहवर्तमान । रावणानुज पलायमान | उत्तरदिशे संचरला ॥ २४ ।। पळतां बिभीषण सद्भाव । दुर्जनी मांडिला विजयउत्सव । राज्यी स्थापूनी पौन्ड्रकराव । शतशीर्ष गेला स्वस्थान। ।। २५ ॥ येरीकडे लंकानाय । राजा फार चिता ग्रस्त । अयोध्ये येउनीयां त्वरित । राजालयों प्रवेशला ॥ २६ ॥ तो राम बैसले सिंहासनी । भोवत्या बंधूच्या श्रेणी । दाटल्या असतां ते श्रवणीं । राक्षसराजा पातला ।। २७ ।। श्रीरामचरण देखतां दृष्टी । रावणानुजे घातली मिठी । रामें आलिंगुनी कंठी । अति सन्माने बसविला ।। २८ ॥ श्रीरामपदोब्जपराग । सेवी लंकेशनयन ग । तो मंद हास्य जानकीरंग । निजभक्तासी अनुवादे ॥ २९ ।। ह्मणे सोडोनी राजासन । दुरी केले आगमन । वदन-चंद्री लांछन । घन चितेचे दिसतसे ।। ३० ।। सांग पां यासि कारण कोण । येरू बोले वंदुनी चरण । तुवां दिधले लंकाधन । ते शतानने हरितले ।। ३१ ॥ शतमुख शंगालदराचरण । ऐकोनी श्रीरामपंचावन । क्षोभला जैसा हुताशन । शुषमे इंधनी स्पर्शता ५ अवसर प्रसंग. ६ मौल-डोकें. ७ भद्रजाती-हत्तो. ८ श्रेणी-पंगती. ९ अज-कमल. १० लांछन-डाग. ११ शृगाल-कोल्हा. १२ पंचाननवाघ.१३. हुताशन-विस्तव, ११ शुजमे पेटे,