पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/245

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२२) वामनपंडितकृत संकलित रामायण. प्रभु करि सह सीता त्या गृहीं लोकलीला श्रवणपठणमात्रे नाशिती ज्या कलीलों ।। खसुखरतविरक्तां सेव्य जो राम होतो स्मरत दुरत काळी श्रीघनश्याम हो तो ।। १०० ॥ स्वधर्मानुकूळ प्रभू भोग सारे । यथाकाळ भोगनि वर्णी असा रे।। बहू वर्षवर्दै जरी राहिलाहो ! दिला वामनाला पदध्यानलाहो ।। १०१।। ॥ इति श्रीसंकलित रामायण संपूर्ण ॥ आनंदतनयकृत पूतना-वध. राया सादर बादरायणि म्हणे एके जगत्पालके ।। केले अद्भुत बाळके रिपुकुळां भंगोनि भुंगालेके ।। जेव्हां दुर्धर पूतना निटिली कृष्णासि ते बारसें . लोकाश्चर्य अनंत वीर्य मिरवे गांभीर्य नाना रसे ।। १ ।। सांग तो मज सविस्तर गाथा | पुण्य पावन करी मुनिनाथा ऐक गा श्रवणभाग्यनिधाना । श्रीहरी-कृत चरित्र-विधाना ॥ २ ॥ जन्मोनि कृष्ण मथुरेत जगी लपाला । तेणे भये चकितबुद्धि तया नृपाला || - भासे दिठी सजन कानन कृष्णरूपे । मानी जसा भ्रमित शुक्तिदलासि रूपें ।। ३ ।। २१ कलि-कलियुग संबंधी पाप. २२ वर्षदें वर्षसमूह.

  • आनंदतनयकत कंदुकाख्यानाच्या आरंभी आम्हों या कवीचे थोडें वृत्त देऊन तो अरणी एथे राहणारा होता असे लिहिले आहे. आज जे प्रकरण छापण्यास आरंभ केला आहे त्याच्या अखेरीस त्याने आपणास “आरणीचा शिपायी" म्हणजे अरणी येथील शूर अंस म्हटल्याचे वाचकांस आढळून येईल. हा कवि एकनाथाचा समकालीन असावा असें अनुमान आम्ही मागेच कळविले आहे. माधवचंद्रोवाच्या सर्वसयहांत व आमच्या काव्येतिहास-संग्रहांत मिळून आजपर्यंत या कवीची लोकबद्ध प्रकरण अकरा छापून प्रसिद्ध झालों आहेत त्यांची ग्रंथसंख्या येणेप्रमाणे:

सीतास्वयंवर-७९, २ सेतुंबध-११, ३ सुदामचरित्र-21, 2 गणिका उद्धार१३, ५ शबरीआख्यान-२१, ६ उमारमासंवाद-१३, ७ मार्कडेयाख्यान६०, ८ ताटकावध-५०, ९ कंदुकाख्यान-३२, १० बालचरित्र-१५, ११ पूतनावध-४८, एकूण ११३ चारशे तेरा. या वरून आजपर्यंत या कवीचा चारशांवर ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला असे होते. १बादरायणि बादरायण म्हणजे व्यास त्याचा पुत्र शुकाचार्य. २ भुंगालक-मुंग्यासारखे काळेकुळकुळीत आहेत केस ज्याचे असा. ३ निवटिली-मारिली, गाथा हकीकत. ५ शुक्ति-शिंपला, ६ रूप-चांदी.