पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/78

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-६. संयमिले मन तेथ चि मच्चित होउनि पावत मत्परसिद्धी ।। आवरतो परब्रम्हमया सकळा हि क्रियावृत्त ते चि त्रिशुद्धि । ऐक्यसखे रचला दुसरेपण किंचित ही भय त्यास न बाधी ।। १४ ।। शाश्वत जे परब्रम्ह तया अपणा करि योग इयापरि योगी । जो यतमानस पूर्ण समाधिस पावतसे स्वसुखी अनुरागी ॥ मज संस्थित शांति अनिर्वचनीय उग्या च परादिक चौघी ।। पावनि ते स्थाळिं होउनि ते पद ते चि अखंडित अद्वय भोगी ।। १५ ।। आइक या समयोगरते सहसा कधिं आहार फार न खावा । आणि निराहार राहं नये न च येकठही जनसंग नसावा ।। फार सुप्तिस घेउं नये काध जागति ही उपदा न करावा ।। चित्त समाधिस ये नृप अर्जुन तोवरि सर्व हि नेम धरावा ।। १६ ।। युक्त विचक्षण युक्तविहार हि इंद्रियचेष्टन युक्त करीतो ।। पाहत बोलत ऐकत युक्त चि चालत युक्त चि ठातो- ।। साधकसंगति युक्त करी निज स्वानुभवाप्रति सोडिच ना तो ।। या परिचा निज योग जया रुचला तरि सर्व हि दुःख हरीतो ॥ १७॥ युक्त असे मणिजे कवणाप्रति आइक ते तुज लक्षण सांगे । जे समयीं निज चित्त नियमित आत्मरुपी स्थिरता लय लागे ।। सर्व हि काम वितृष्ण अहार्नेशि सर्व किया स्वरुपी स्थिति जागे ।। ते समयीं परब्रम्हि च निश्चित इंद्रियग्राम सुखेनि वागे ।। १८ ।। योग करी निज चित्तनिरोधन आत्मिक योजित योग मनासी ।। आत्मसुखें सुख भोगि अखंडित निश्चळ बुद्धि स्थिरे अविनासी ।। दीप जसा बहु कोडानचा बिनवायु अचंबळ दिव्य प्रकाशी ।। तेपरिचा स्मरतो मज सम्यक योगि असा परब्रम्हनिकासी ।। १९ ।। यापरिचे निज ऊपरमा प्रति पावत ने स्थळि चित्तसमाधि । राधान राखत योग सुखेनिव जन्मजरादिक नासत ऑधि । आपण लक्षितसे अपणास चि आपण सर्व हि शुन्य उपाधि ।। ते स्थळ आत्मस्वरूपक जाणनि हर्ष तया परि योगसुसिद्धि ॥ २० ॥ में सुख फार अपार अंतींद्रिय वाङ्कन गोचर नो हे कदापी ।। ३३ अनिर्वचनीय अवर्णनीय. ३४ परादिक-परा, पश्यंती, मध्यमा, वैखरो सषप्ति झोंप. ३६ सुखनिव-सुखेनैव ( सुखाने ). ३७ आधि मनोव्यथा. ३८ उपाय पाण्यांत मूर्यबिंब दिसते. एथें पाणो हे बिवाची " उपाधि होय. आरशांत रूप दि एथे आरसा हो रूपाची उपाधि.३९ अतींद्रिय-इंद्रियांचे द्वारें न समजणारे. 20. वा नगोचर-वाणो आणि मन यांस कळणारे.