पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-९. पण्य सरे मग त्या परि दीक्षित द्वार हि पाहुनि ये नयनांनी ।। भोगुनि स्वर्गसुखासि धरे उतरे बहु भोगित या जिवयोनी ।। या परिचे त्रेयिधर्म चि कामुक त्या भवसंगतिने सुखहानी ।। २१ ।। चातक नेवि घनाश करी जिवना परि बाळक चितिति माता ।। तेवि अनन्यगती मग चितिति जे जन जाण उपासति ताता।। ते मज माजि मि त्यां आंत बाहिर गोरे जसी जिवनी बुडवीतां ।। हो निज योगे मि वाहे निरंतर क्षेमपुरःसर पांडवनाथा ।। २२ ॥ जाण जरी जन सर्व उपासति आवडिने विधिपूर्वक देवा ।। ते हि तरी मज पावति मी मळ सर्व उपासन सार्थक भावा ।। पति लवे तित नेत्र सुखावत जीव तसे सुखप्तिस पावा ।। मद्रप देव समस्त हि अर्जुन भिन्न नसे कधिं देह अवा ॥२३॥ यज्ञस्वरूपक मी वदती श्रुति सर्व हि यज्ञमुखे मि च भोक्ता ।। यज्ञ हि मी च धनी मज अर्पित यज्ञ समाप्तिस मी फळदाता ।। पापरि नेणुनियां मन अग्निरवीवरुणादिक इंद्र समस्तां ।। जे भजती गति पावति ते तुज सागतसे धरि अंतरि पार्था ॥२४॥ देवयंजी तरि देवपदा प्रति पावति योजक देव चि होती ।। पितृव्रते प्रितिपूर्वक आचरतां पितरांवरि निश्चित येती।। भूतगणां भजती भुत होतिल जे मन आवडिने भजताती ।। मत्पर ते मज पावति निश्चित अक्षय मद्रुप होउनि ठाती॥२५॥ आइक मत्परनिष्ठ कसा तरि पुष्प समर्पि फलादिक झालें। हे न मिळे तरि काय उणे जळ अर्पण आवडिने मज केले ।। ते मुखि घालुनि भक्षितसे जणु अन्न नसे बहु काळ भुकेले ।। तांदुळ विप्रकरार्पित द्रौपदिशाकमुखे भुवनत्रय धाले ॥ २६ ॥ पाहसि बोलसि ऐकसि चालसि इंद्रियधर्म समस्त करीसी ।। की बहु घड्रेस भक्षण भक्षिसि भोगिसि भोग अपार मुखासी ।। यज्ञ अनेक विधी यजिसी बहु दान जना धन घेसिल देसी ।। श ४१ दीक्षित याशिक. ४२ त्रयी-ऋक्, यजुः, व साम हे तीन वेद.१३ घना मेघाची आशा. १४ जीवन पाणी. ४५ गार पाण्याची गार, बर्फ. १६ योग=जी वस्त पणाजवळ नाही ती प्राप्त करून घेणे. १७ क्षेम-प्राप्त झालेल्या वस्तूचे रक्षण करणे. पात डोळ्याचे पाते. १९ अवेष अवयव. ५० यजी-पूजक.५१ याजक यजी. षड्रस-गोड, तिखट, तुरट, आंबट, खारट, कडू हे सहा रस (एक द्वित्र्यादियुक्त्या म कटुकषायाम्लक क्षारतिक्तैरेकस्मिन षड्रसैः स्युगणक कति वद व्यजने व्यक्तिभेदाः ।। भास्कराचार्यरुत लीलावती)